Karun Karun Kalji Mazi-Shubhankar Kulkarni
HQKarun Karun Kalji Mazi-Shubhankar Kulkarni无损flac下载mp3下载
Karun Karun Kalji Mazi-Shubhankar Kulkarni 在线试听歌词免费下载
करून करून काळजी माझी,
करून करून लाड
दमलात तुम्ही आई बाबा,
झोपा जरा गाढ
मागणार नाही उगाच खाऊ,
मागणार नाही खेळ लवकर उठेन,
आवरायाला लावणार नाही वेळ
शाळेमध्ये जाईन रोज, सगळा डबा खाईन
अभ्यास करीन टीव्ही सुद्धा थोड्याच वेळ पाहीन
देवापुढे लावीन दिवा, जेवण करीन मस्त
वरण भात भाजी चटणी सगळं करीन फस्त
शेपूचीही भाजी सांगेन आई दोनदा वाढ
वागणार नाही वाईटसाईट राखीन तुमचं नाव
माझे आई बाबा म्हणून ओळखेल तुम्हां गाव
लवकर लवकर शिकीन आणि लवकर मोठा होईन
बाबासारखे ऑफिसातून पैसे घेऊन येईन
वणवण करतो बाबा त्याचे कमी होईल काम
दमला तो ही त्याला आता मिळू दे आराम
भाजी आणीन आईसाठी लॉंड्रीमध्ये जाईन
दोघांनाही फिरायला गाडीमधून नेईन
आई म्हणेल हेच का ते कार्ट माझं द्वाड
घट्ट मिटा डोळे, तुम्हां कुशीमध्ये घेतो
पांघरायाला माझं मऊ पांघरूण देतो
झालो आता मोठा सांगा छळेल तुम्हां कोण
आई बाबा तुम्ही आता मुलं माझी दोन
पाहू नका असे आता नाते झाले नवे
मात्र आता तुम्ही माझे ऐकायला हवे
का रे बाबा मिशीमध्ये हसतोस असा
आई बघा रडू लागे, डोळे तिचे पुसा
हात जोडे आई, बाबा म्हणतो लबाड
Karun Karun Kalji Mazi-Shubhankar Kulkarni歌曲下载
| 歌曲 | 歌手 | 专辑 | 时长 | 歌曲下载 |
|---|---|---|---|---|
| Karun Karun Kalji Mazi | Shubhankar Kulkarni | 06:13 |
|